‘शब्दांची रोजनिशी’ : वरवर हे नाटक जरी भाषेच्या राजकारणाचा प्रश्न उपस्थित करत असले, तरी ते मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मूलभूत स्त्रोतांचा परिचय करून देते

या नाटकात दोनच पात्रे आहेत. पुरुषाचे नाव ‘ज्ञ’ आहे आणि स्त्रीचे ‘अ’. या अतितंत्रशास्त्रीय जगात भाषा लुप्त होत आहेत. जिवंत माणूस मोबाईलचा... आधार कार्डचा नंबर झाला आहे. त्याला जिवंत आयडेंटिटी राहिलेली नाही. केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा जगाशी संपर्क आहे. प्रत्यक्ष जैवसंबंध पूर्णपणे अनुपस्थित आहे. त्यामुळे हे जणू अति-उत्तर-आधुनिक काळातील ३२१व्या मजल्यावर राहणारे ईव्ह आणि ॲडमच असावेत असे वाटते.......

ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’मुळे कामाठीपुऱ्याचे दर्शन मराठी जाणीवेला याअगोदरच झाले आहे, ‘कामाठीपुरा’ या कादंबरीनेे ही ‘परंपरा’ कथात्म रूपात पकडण्याचा प्रयत्न केला आहे

जातपात, धर्मभेद हे प्रश्न कामाठीपुऱ्यात नाहीत. हा इलाखा धर्मनिरपेक्ष आहे. मात्र, इथे राजरोस स्त्रीदेहाची खरेदी-विक्री चालते. लाखो रुपयांचा रोकडा हिशोब इथे चालतो. दहशत आणि हिंसा नांदते आणि त्याचा सरळ संबंध आर्थिक गणिताशी असतो; जगण्याच्या प्रत्यक्ष कोलाहलाशी आणि संघर्षाशी असतो. इथे मृत्यू स्वस्त आहे; रोगराई कल्पनेच्या पलीकडची आहे. अफाट देहाची, पिळदार शरीराची पोरं इथं काही वर्षांतच रोगग्रस्त होऊन नाहीशी होतात.......